Thursday, 30 November 2017

Keyboardचं मनोगत

तसा राग तुझा माझ्या सर्वच अवयंवर निगतो
पण ENTER हाडाला मात्र तू खुप जोरात मार्तोस

बाजूवाले तुझ्यावर बरसले की NUMBER KEYS ची पण गय नसते
आणि ESCAPE ला तर तू चांगलाच आपटून टाकटोस

तुझा आर्धा दिवस तर ALT + TAB वर निगून जातो
बोटं लहान असली तरी तू कसा बसा CNTRL आणि  - चा पल्ला गाठतोस

काही काही वेळेला तर तुझी नखं पण लागतात राव
रंगबिरंगी असली तरी टोचतात ती खतरनाक

तसा अत्याचार हा असला जरी माझ्यावर
पण तुझ्या कडे बघून काही बोलावसं वाटत नाही

चेहऱ्यावर तुझ्या अनेक प्रश्न दिसतात
डोळे भरलेले असतात पण बांध तू तुटू देत नाही

तुला खूप काही बोलायचं असतं, प्रत्येक क्षण जगायचं असतं
पण DESK च्या भिंतीन व्यतिरिक्त तुझं कोणी ऐकत नाही

एकटा मनातल्या मनात युद्ध लढतोस
आणि संयम संपला कि फक्त शांत होतोस

इतका तू थकतोस तरी काम तुझं काही संपत नाही
किती हि काहीहि झाला तरी येऊन पुन्हा कामाला लागतोस

तुझ्या समोर माझ्या वेदना मला जाणवतच नाही
सगळं दिसतं मला पण धीराचे दोन शब्द बोलता येत नाही

म्हणून माझ्या हाडांवरचा राग हसत मुखत सहन करतो
काही क्षण का होईना तुला थोडंस  बरं वाटते 
यातच मी स्वतःला समाधानी मानतो



-SR.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.