कुटुंबाची निवड आपल्याला
करता
येत
नाही.
पण
मैत्री
हे
नातं
आपण
ठरवतो.
आयुष्याच्या
प्रवासात
आपण
अनेक
लोकांना
भेट
तो.
पण
सगळेच
आपले
मित्र
असतात
असं
नाही.
कारण
मैत्री
करणं
जरी
सोपं
असलं
तरी
ते
टिकवणं
सगळयांना
जमत
नाही.
कॉलेजच्या काळात आम्ही सर्व भेटलो. तेव्हा उद्या येणाऱ्या आयुष्याचे इतकं कोण विचार नाही करत. १५ - २० ची टोळी मधून आम्ही ६ उरलो. पण आज आमच्या नात्याला १४ वर्ष झाली. आणि नुक्त्याच उमगलेल्या फुला सारख ते अजून टवटवीत आहे. आज ही तेच हास्य, एकमेकांना टोमणे मारणं, काही कारण नसताना भांडणं. कॉलेजच्या तीन वर्षात जे रोज भेटायचे ते नंतर फक्त काही ठराविक उत्सव पुरतं मर्यादित राहिलं. परुंतु नात्या मधला ओलावा काही कमी झाला नाही. आम्ही आपआपल्या ऑफिसच्या म्हणा किंवा दुसऱ्या मित्रां सोबत अनेक पिकनिक केल्या असतील. पण आमच्या या १४ वर्षाच्या नात्यात आम्ही एकच पिकनिक घेतली. अर्थातच तिच्या आठवणी आहेत पण मला मात्र हे सर्व आज हि शिव्या घालतात.
कधी कधी तर आम्ही कित्येक दिवस एकमेकांशी बोलत नाही. मुद्दाम असं नाही पण रहदारीच्या जीवनात राहून जाते. पण आयुष्यात कुठला हि काठीन प्रसंग आला कि सर्वात पहिला ज्यांचं नाव मनात येत ते हीच लोक. निस्वार्थ मैत्री काय असते हे मला यांनी शिकवलं. एकमेकांनच्या मदतीला वेळप्रसंगी धावून येणं हे मी यांच्याकडून अनुभवलं. जरी रोज आमच्या आयुष्यात काय चालत असेल हे नसेल ठाऊक आम्हाला पण सवांद कधीच तुटला नाही. नुसतं एक कॉल वर सगळं काही भरून निगत. यांच्या शी खोटं बोलायची गरज कधीच पडत नाही. कारण एक मेकांच्या आवाजावरून आम्ही ओळखतो सगळं काही ठीक आहे कि नाही.
नशीब असावं लागत आयुष्यात खरे मित्र मिळण्यासाठी. आणि मी ते या जन्मात अनुभवत आहे. आज आमच्या मधल्या काहींचे लग्न झाले तर काहींचे शोध प्रक्रिया सुरु आहेत. कुटुंब हा जरी वाढतोय पण त्याचा पाया आज ही मजबूत आहे. माझ्या तर्फे मोहमद रफी साहेबांच्या गाण्याचे शब्द मी या सर्वांना अर्पणकरू इच्छितो
एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो
ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो
आपली मैत्री चिरायू होवो
Note: As Sent To Maharashtra Times on 6th June 2020, with hope that it gets published.

It was published in Mumbai Times (Supplement of Maharashtra Times) on 24th June 2020.
-SR
PS: May The Force Be With Us !!!