लहान असताना सगळेच विचारायचे
तुला मोठे पाणी कोण व्हायचं आहे
पण आज जर मला कोणी विचारलं
तर मी एकच म्हणीन
मला पुन्हा लहान व्हायचं आहे
किती निरागस होतं ते आपलं जगणं
ना कसली फिकीर नाही कसला विचार
सकाळचा अलर्म म्हणजे आईची हाक
आणि डोळे बंद होणार तेव्हा रात्रीची झोप
आता तर झोपेचा नाही ठिकाणा
आणि नोकरी धंद्याच्या ओझ्यात
सकाळी नुस्तं अलार्म चा सपाटा
मन मोकळं होऊन बोलायचं ते दिवस
आणि मोजून मापून बोलण्याचे हे दिवस
पिकनिक म्हटले की नुस्तं कल्लं
त्या क्षणा मधे बेधुंद होऊन जगायचे
आणि आता फक्त फोटोच असतात
पण त्यात आपण किती जगलो ते क्षण ?
माहिती नाही
धावपळीच्या या जीवनात आयुष्याचं मूळ रस
निघून गेला आहे
मोठे होण्याच्या शर्यतीत आपण लहानपण
गमावला आहे
लहान होतो तेव्हा फक्त मोठे पणा ची ओढ
आणि आज लहानपणाची किंमत कळली
-SR.
PS: May The Force Be With You !!!