प्रति: सिद्धेश राणे
प्रेषक: निकिता नाईक
स. नि. वी. वी
पत्र लिहिणयास कारण म्हणजे तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं. तीस वर्षाची घोडी झालीस आता. काळजी पूर्वक धम्माल कर.
नुकतीच दिवाळी संपली. मागचा महिना थोडा कठीण होता तुमच्या साठी हे ऐकून होतो. परंतु सगळं आता नीट चाललं आहे हे समजल्या वर बरं वाटलं.
पुणे मधल्या नवीन वास्तू बद्दल समजलं. खूप बरं वाटलं ऐकून. अशीच प्रगती करत रहा.
भेटवस्तू बद्दल म्हणायचं तर या पुस्तकबद्दल ऐकून होतो मी. तसं वस्तू तुला देण्याचं काही अर्थ नाही कारण ती तुझ्या कडे आधीच असायची. म्हणून ही लहानशी पुस्तकरूपाने भेटवस्तू. आशा आहे की तुला आवडेल आणि तू आधी वाचली नसावी.
घरी काका काकूंना माझा नमस्कार सांग आणि शुभम ला आशीर्वाद.
इकडे सगळं ठीक आहे. काळजी घ्या. तिशीच्या मंडळात आपले हार्दिक स्वागत.
- सिद्धेश राणे
हो विचार होता पत्रा द्वारे शुभेच्छा द्याच्या. आणि पत्र म्हणजे जे तुला पोस्टमन ने दिलं असतं ते. पण मग ते कधी पोचेल हे माहीत नव्हतं. आणि गिफ्ट अन् पत्र वेगळं पोचले तर थोडा अन्याय होतो त्या गिफ्ट वर.
विना शब्दांच्या गिफ्ट जर मी पाठवली तर ती वस्तू वाटते मला.
आणि सध्याच्या काळात मी असं एक पत्र पाठवून द्याचा म्हटलं असतं तर पोस्टमन स्वतः म्हणाले असते, " व्हॉट्स अप कर की गड्या, का त्रास देतोस आम्हाला "
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
-SR.