Saturday, 13 July 2019

ते प्रेम

त्याला शोधण्याचा प्रयत्नं मी खूप करतो
पण प्रेम आहे कि सापडतच नाही

डोळे आणि कान नेहमी उघडेच ठेवतो
पण त्याला मी, ना ही दिसतो कि ऐकू येतो

कसं आणि कुठे शोधू मी तुला
हा प्रश्न मला सारखा पडतो

अजून कुठला प्रयत्नं करू
की तू हि येशील माझ्या वाट्याला

आपल्या माणसांच्या गर्दीत सुद्धा हरवल्यासारखं भासतं
एखादं पाऊल चुकीचं तर नाही पडणार 
याची सतत भीती असते

लोकं विचारतात मला, "काय व्याख्या काय तुझ्या प्रेमाची ?"
तर माझी उत्तरं अगदी सोप्पी असतात

आयुष्यातल्या प्रश्नां ना हि जगायचं उमेद देतो
ते प्रेम

नात्यामधील गुंते सोडवण्याची गम्मत ज्याला कळते
ते प्रेम

जे सहज हाती येत नाही आणि आल्यावर ही रोज कमवावं लागतं
ते प्रेम

आयुष्याच्या काळोखात जे मशाल पेटवून जातं
ते प्रेम

प्रत्येक क्षण त्या व्यक्ती सोबत जगण्याने आपल्यात जी ऊर्जा निर्माण करते
ते प्रेम

म्हणून कदाचित माझ्या वाट्याला येत नसावं
कधी कधी वाटतं आपण प्रेमासाठी बनलोच नसावे

पण तसं असला तरी हार काही मी मानणार नाही
खडतर आहे हा प्रवास पण काही  तरी मार्ग निगेल
असा विश्वास आहे माझ्या मनी



-SR.