Monday, 17 February 2020

तू माणूस आहेस

तू माणूस आहेस 
कितीही केलं तरी कुठे तरी कमी पडणारच

आपण कितीही म्हणू मी पूर्ण विचार केला आहे
त्याने फक्त मनाचं समाधान होईल
कुठे तरी काही तरी सुटणार 

तू माणूस आहेस 
कितीही केलं तरी कुठे तरी कमी पडणारच

लढाईच्या पूर्व तयारी ला 
आपण कुठलीच कसर नाही सोडणार
पण युद्धाचा निकाल जेव्हा विरुद्ध लागणार
तेव्हा दोष आपण नशीबा वर टाकणार

प्रत्येक शेर ला एक सव्वा शेर मिळणार

तू माणूस आहेस 
कितीही केलं तरी कुठे तरी कमी पडणारच

आपण म्हणू तीच पूर्व दिशा हे वागणं मुळात चुकीचं
कारण कितीही उदार मतवादी आपण स्वतःला म्हणू
तरी कोणासाठी तरी आपण संकुचित असणार

तू माणूस आहेस 
कितीही केलं तरी कुठे तरी कमी पडणारच

आयुष्यात एकच गोष्ट कायम स्वरुपी आहे
आणि ती म्हणजे बदल
म्हणून आपले सर्व विचार 
काळासोबत बदला वेच लागणार

शेवटी आपण माणूसच आहोत ना
किती ही म्हटलं तरी कुठे तरी कमी पडणार


-SR.

PS: May The Force Be With You !!

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.