Friday, 14 February 2020

द लिटिल थिंग्ज

आज काल वेळ इतक्या वेगाने बदलत आहे. डोळ्याच्या पापण्या मिटून उघडेस्तोवर आजू बाजूचे जग बदलले असेल | रोजच्या वेळे प्रमाणे कामावर जायला बस स्टॉप वर उभा होतो | तेव्हा बाजूंनी जोरात गाणी वाजवत एक रिक्षा गेली | सहज डोळ्या समोर शाळेचे दिवस आले | त्या वेळी खरं तर रिक्षाचा प्रवास हे देखील किती मोठी गोष्ट होती | पण  जेव्हा जायचं ठरलं तर आधी डेक वाली रिक्षा शोधायचं | जणू ती एक सवयच होती | आणि जसं मी त्या दिवसांन मधून बाहेर आलो आणि आजू बाजूला पहिला तर आज प्रत्येकाच्या कानात डेक सारखा आवाज देणारे एरफोन आहेत | म्हणून कदाचित तो रिक्षा वाला गाणी तर वाजवत होता पण त्याची रिक्षा मात्र रिकामी होती |

सकाळी नाश्ता करताना तारक मेहता का उलटा चस्मा बघायची सवय आहे मला | आज जो भाग लावला त्यात लहान मुलांचे उन्हाळ्याच्या सुट्ट्या यावर होतं | आणि त्या वेळी देखील मी माझ्या समर व्हेकेशन मध्ये रमलो | घरी असलो की गम्मी बेर किंवा टेल स्पिन किंवा डक टेलस किंवा स्मॉल वंडर किंवा जंगल बुक अशे कार्टून बघायचे | आणि मैदानी खेळ म्हटलं तर क्रिकेट, लगोरी, लपा छुपी, बचाव साखळी ह्यात वेळ कसा आणि कुठे जायचं काही समजायचं नाही | जर आई वडिलांना कामावर सुट्टी मिळाली तर एखाद फेरी गावची सुद्धा व्हायची | आणि आज काल तर सकाळ झाली की रात्र कशी होते हेच कळत नाही |

किती गरजा कमी होत्या ना आपल्या 
आई नी बनवलेली मॅगी ने सुद्धा वेगळीच मज्जा यायची

जेवायला बाहेर जायचं म्हणजे नुसती धम्माल
काय खाऊ आणि किती खाऊ असं व्हायचं

क्रिकेट मध्ये रोज भांडण व्ह्याची
कधी कोणाची काच फुटायची तर कधी तूब लाईट

पण एक बाटली पाण्याची मिळाली 
की त्यात अखी टीम आपली तहान विजवायची

उन्हाळ्यात बर्फाच्या गोळ्याचा आणि कुल्फी च सुख 
ह्याला तर व्यक्त करण्यास शब्दाचं नाही

आज आपल्या कडे सगळे काही आहे
रोज नाश्त्याला खाऊ इतकी मॅगी
आणि रोज वेगळं हॉटेल मध्ये जेऊ इतकी दुकानं

आइस्क्रीम चे प्रकार इतके आहेत 
की पूर्वी आपण काळजी घ्याचो, खाताना सांडू नये
आणि आता तर अर्धा आइस्क्रीम 
हा गलासच्या बाहेरच असतो

पण एक गोष्ट आहे जी तेव्हा आपल्या जवळ होती 
पण आज नाही आहे
आणि ते म्हणजे समाधान मनाचं

धावपळीत आपण थांबायचं विसरलोय
एक टप्पा गाटला की दुसऱ्या शर्यतीला लागतो

म्हणून कदाचित तो डेक वाला रिक्षा आज रिकामी होता | कारण लहान गोष्टींचा आनंद घ्यायला आपल्याला संकुचित वाटतेय | 


-SR.

PS: May The Force Be With You !!

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.