Wednesday, 21 December 2016

चिनी कम

पाहिलंच कधी मागे वळून
कसाही आज असेन 
समाधानाचं हस्सू मात्र
नक्कीच चेहऱ्यावर येतं

उद्या नसीन जरी या जगात
खांदे शोधावे नाही लागणार चार
याची खात्री वाटते

पण कधी कधी का कोणासठाऊक
ह्या गर्दीत एकटेपण जाणवतं

दिव्यांचा प्रकाश सुद्धा 
मनाच्या काळोखास अपुरा पडतो

प्रवासात सहज डोळा लागतो 
तर डोकं टेकण्यास खांदा सापडत नाही

चालताना एखाद्याचा हात धरावा
असा सहवास लाभत नाही

वाटते कोणी आपणासही जवळ घ्यावा
All Is Well म्हणत
एक घट्ट मिठी मारावी

पण सारंच मिळत नाही याची जाण आहे
म्हणून अपेक्षा देखिल फार थोडक्याच आहेत

मग कधी आपल्याच हातावर डोकं ठेवून दोन क्षण निजतो
तर स्वतःलाच मिठीत घेऊन ,All will be well म्हणतो

कोडं आयुष्याचं हे असंच असतं
जितकं सोप्पं दिसतं चक्रव्यूह तेव्हाच उलघडून येतं

-SR.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.