Monday, 5 December 2016

प्रथम शुभेच्छा

एक बाळ गोजिरवाणं
माझ्या अंगणी नाचलं
घेता ओंजळीत त्याला
हे हळवे मन विरघळलं

तुझ्या निरागस डोळ्यात
माझं सारंच जग सामावलं
खोडकर हस्सू तुझं पाहून
माझं स्वप्नच जणू समोर अवतरलं

बगता बगता कुशीवरून
उपडी तू परतलास
अन बोठ धरुनी माझे
आज पायावर उभा राहिलास

भिऊ नकोस तू या जगाला
तुझी हि आई पाठीशी कायम आहे
पावलांना तुझ्या धैर्य लाभो
आणि घे गगन भरारी

हीच प्रथम वाढदिवसानिमित्त
माझ्या कडून तुला शुभेच्छा आहेत


-SR.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.