Monday, 9 March 2015

एका मैत्रीची गोष्ट

आज आठवली म्हणून सांगतो एक गोष्ट,
गोष्टीमध्ये एक होती ती आणि एक होतो मी |

आजही आठवतो कॉलेजचा तो पहिला दिवस,
पुढच्याच बेंच वर बसली होती ती |

शांत, निरागस हाताची घडी तोंडावर बोट,
मला वाटला जास्त बोलकी नसावी ती |

सत्य मात्र वेगळच होतं,
आणि अवघ्या काहीच दिवसात,
पूर्ण क्लास ची लाडकी बनली होती ती |

क्लास मध्ये असं कोणीच नाही
जो तिला ओळखत नसे
नुसता मित्रांचीच नव्हे
तर टीचेर्सची सुद्धा फेवरेट होती ती |

समाजसेविका होती ती बीकॅफ ची
कोणासाठीहि निस्वार्थ मदत करण्यास कायम तत्पर |

पाणी गिला है आणि तेल ओईली है असं तत्वाञान शिकवणारी
मूर्ती तशी लहान पण खोड्या करण्यात कीर्ती तिची महान होती |

तिच्यातला बिंदासपणा कायम आकर्षित करायचा
तिच्या बद्दल मुलांन मध्ये असलेला रेस्पेक्त पाहून खूप बरं वाटायचं |

तिची अदा इतर सर्व मुलीन पेक्षा निराळी होती
तिच्या सारखी ती एकुलती एकचं होती |

चेहऱ्यावरचे तिचे भाव कायमच हसरे असतं
मनातले मात्र कायम लपवून ठेवायची ती |

काय जादू होती तिच्या डोळ्यांमध्ये माहित नाही
एकदा पाहिलं कि पाहताच राहावं असं वाटायचं |

तिला हसताना पाहिलं कि दिल गारडन-गारडन व्हयाचं
तो काळ ती वेळ तशीच थांबून राहावी असं वाटायचं |

त्या एका क्षणात काळजाचा ठोका नक्की चुकायचा
जेव्हा चेहऱ्यावर आलेले केस मागे टाकून ती वर पहायची |

तिच्या गोड मिठीत सारं काही स्थब्ध व्ह्याचा
आभाळाच्या कुशीत असल्यासारखा जणू मी स्वतालाच विसरून जायचो  |

आठवत नाही पहिल्यांदा केव्हा बोललो
सेकंद ईअर मध्ये मात्र आम्ही बेस्ट फ्रेय्नड झालो |

दिवसातला एक क्षण नाही जेव्हा तिची आठवण नसे
आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तिला सांगण्याची घाई असे |

मनाच्या कोपर्यात दडलेल्या गोष्टी सुद्धा तिच्याशी शेयर करायचो
तिच्या सोबत असताना मी, मी म्हणूनच वावरायचो |

शब्दांची गरज फारच कमी वाटे,
अवघड वळणाचे शब्द सुद्धा अर्थासह डोळ्यातून एकमेकांनं पर्यंत पोचायचे |

हे नक्की मैत्री होती कि प्रेम ते कळतं नव्हतं
पण जे काही होतं त्याने आयुष मात्र खूप सुंदर झाला होतं | 



-SR.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.