Monday, 2 March 2015

वेळ लागतो

वेळ गेली कि सगळं काही बिघडतं नाही,
कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |१|


सरळ रेषे प्रमाणे आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत गेल्या तर ते कसलं आलंय आयुष,
रहस्य तर चाक्राव्युह्चा प्रवास केल्यावरच उलघडतो  |

सुखानंतर दुःख येते आणि दुखानंतरच सुखं,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |२|


दु:खाचं डोंगर कितीही कोसळं तरी थबकून चालणार नाही,
लांबचा पल्ला गाटायचा आहे, अर्ध्या वाटी थकून चालणार नाही |

कोंबड किती हि झाकलं तरी सुर्य हा उगवतोच,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |३|


अपयशाच्या काळोखात आयुष असह्य वाटू लागते,
कधी कधी तर आपल्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उगवतात |

भरती नंतर आहोटी आणि आहोटी नंतर पुन्हा भरती या निसर्गाच्या नियमास कोणीच अपवाद नसते,
म्हणून कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो |४|



-SR.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.