Monday, 1 September 2014

मी मराठी - My Marathi

भावना व्यक्त करण्यास भाषेचं बंधन नसतं,
परंतु आपल्या मातृभाषेत करण्याची मज्जाच वेगळी असते |
शब्दकोश दांडगा असावा असं काही नाही,
मनातल्या संवेदना कलम आपो आप पानांवर उत्रवत असते |

जात पात धर्म मानतो मराठी,
शाळा होती इंग्रजी, ज्ञान अमृत कमीच पडलं मराठी |
प्रयत्नांती यश प्राप्ती, मॅडमचे हे वाक्य आठवले,
धैर्यने घेतलं कलम, आणि पाहताच शब्द आपोआप अवतरले |

लिहलेले शब्द एकदमच आपलेसे वाटतात,
वेगळाच आनंद देत, चेहऱ्यावर हसू फुलवून जातात |
मनात विचारांची धांदल उडते,
नक्की कशावर लिहावं याचीच तारांबळ उडते |

खूप विचार करून आज अखेर शंख फुंकला,
कित्येक वर्षाच्या इंग्रजी प्रवासात, आज मराठी सुर्य उगवला |
आता बाळगला मनाशी एकचं ध्यास,
मी मराठी - My Marathi,
हीच आपली ओळख आणि हाच आपला अटाहास |



-एस.आर

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.