Sunday, 7 September 2014

एक मिठी प्रेमाची

तिचा जन्म होताच सगळेच चेहरे काही आनंदित होत नाही
भूरसटलेले विचार असणारे, त्या गोजीर्वाण्याला तिच्या पहिल्या क्षणातच कोसतात |

जन्माला आलेल्या मुलाचं कोड कौतुक करताना शब्द अपुरे पडतात,
परंतु मुलीचा मात्र त्याच क्षणी जगाशी युद्ध आरंभ होते |

भातुकलीचा खेळ खेळत बालपण सरतं,
अनेकांचा राग द्वेष सोसत, आयुष जगण्यामधे ती मग्न होते |

मौज करण्यासाठी मुलांना काही बंधन नसतं,
पण तिच्या पायात मात्र परंपरेच्या बेड्या कायम ठोठावल्या जातात |

येणारा प्रत्येक व्यक्ती आपले विचार तिच्यावर लादत असतो,
तिच्या आतल्या मी पणाला जणू प्रत्येक जन ठेचत जातो |

मुलगी म्हणून आई वडिलांचा,
बायको म्हणून नवर्याचा आणि,
आई म्हणून स्वताच्या मुलांच,
या सर्वांचे मनं जपेस्तोर तिचं उभं आयुष निगुन जातं |

कौतुक तर दूरच, नुसतं जान देखील ठेवण्यास
या तीनही पिड्या विसरून जातात |

सगळ्यांच्या आनंदात ती रमते, सर्वांना दुखात ती सावरते,
पण तिच्या भावना मात्र कायम सगळेच गृहीत धरतात |

आरश्यात पाहून कधी तरी गुपचूप हस्ते,
रात्रीच्या काळोखात कोपर्यातच ती रडते,
तिचा आयुष हे कायमचं,
तारेवरचं कसरत होऊन बसते |

नाही कपडा लत्याची, कि दाग दागिन्याची,
याची तिला कधी हि हाव नसते |

कायमच ज्याची ती वाट पाहते,
ते दोन शब्द आदराचे आणि एक मिठी प्रेमाची |




- एसआर



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.