आनंद तसं कुठून ही मिळाला
तरी त्यात आपण खुश राहायचं
असं म्हणतात सर्व
मग जरी तो दुसऱ्या साठी असला
तरी देखील
जरी त्यात आपल्याच जखमांची खपची उडाली
तरी देखील
आपल्या दुःखाचं डोंगर हे आपल्यालाच पेलयच आहे
उगा दुसऱ्यांच्या सुखात का त्याची सावली ?
म्हणून खोटं का होईना पण हसायचं
जीव घुसमटत असेल, तरी देखील
आपली लढाई ही आपल्यालाच लढायची आहे
मग त्याचा वार दुसऱ्यांच्या यशात कशासाठी
म्हणून अभिनंदन सुध्दा मनापासून करायचं
मन मोडलं असेल तरी देखील
आपल्या आयुष्याचे प्रसंग हे आपल्या कर्मान मुळेच आहेत
नुसतं नशिबाने काही मिळत नाही
म्हणूनचं, दुसऱ्यांच्या कष्टाला सलाम करायचं
आपल्याला चीज मिळत नसेल, तरी देखील
कधी तरी, आपला ही सूर्य उगवेल
पण म्हणून काही, रात्रीच्या काळोखात माणसं नाही तोडायची
मग डोळे भरून येत असतील, तरी देखील
-SR.
PS: May The Force Be With Me !!
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.