भरलेला पूर्ण ग्लास कायम नुकसानच करतो
दोन थेंब किंवा दोन घोट, पण पाणी नक्कीच सांडवतो
सगळंच मिळाला जर आयुष्यात
तर जगण्याला काही अर्थ उरत नाही
उद्याची सकाळ आज पेक्षा जास्त सुंदर असणार
हा नुसता विचारच मनात अशा निर्माण करतो
माणूस आहोत म्हणून आपण हळवे होतो
टोचलेल्या लहान पिनचं दुखणं सुद्धा डोंगरा एवढं भासतं
आपल्या माणसांच्या गर्दीत पण एकटे पण जाणवतं
काय बोलायचं आणि काय समजवायचं कोणाला
हाच यक्ष प्रश्न निर्माण होतो
पण बाकींच्यां प्रमाणे ही रात्र सुद्धा सरणारच
कोंबडं किती हि झाकलं तरी सूर्य तो उगवणाराच
मातीच्या कणाला सुद्धा पावसात भिजावं लागतं
तेव्हा कुठे मातीचा महागडा अत्तर जगभर पसरतो
मग आपल्या हिश्याचा थोडा पाऊस आशेच्या रेनकोट मधे काढला
तर नंतर येणारी हिरवळ आयुष्याचे सर्वच रंग बदलून टाकेल
-SR.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.