ज्याची आतुरता गेल्या महिनाभर होती
अखेर त्या पावसांच्या सरी आज बरसल्या
हो पण या वर्षी काही भिजायची सोय नाही आहे तशी
कारण नुसती सर्दी जरी झाली तरी तुम्हाला कोरोना तर नाही ना?
असं प्रश्न सर्वांनाच पडणार
तसं हा वर्ष एक कसौटिच आहे जगासाठी
कोरोना ह्या महामारी ने सर्वच त्रस्त आहेत
मन मोकळं फिरणं ते, एके काळचे
आज नुस्तं घरतना बाहेर पडायला सुद्धा भीती वाटतेय
कुठल्या क्षणाला कोणता व्यक्ती किवा वस्तू पासून
कोरोनाचा संसर्ग आपल्याला होईल
त्याचा काही नेम नाही
जे देवांना देवळात शोधतात त्यांची दारं तर कधीच बंध झाली
आता तर मात्र आपल्या लाडक्या बाप्पांनी देखील
क्वारांटीन होण्याचा निर्णय घेतला आहे
तसं ह्याची कल्पना होती मला
कारण जेव्हा लोक महाराष्ट्र दिन किंवा शिवराज्याभिषेक
या सोहळांन साठी सज्ज होत होते
तेव्हा एक जाणीव होती मनात
की कदाचित ही दिवाळी सुद्धा सुकी सुकी जाणार
कधी कधी तर त्या कोरोणा पेक्षा त्या रुग्णालयांचा बिल
ऐकुन काळजाचा एक ठोका चुकतो
असो ! कदाचित या वर्षातून सुखरूप बाहेर पडणच
२०२०च ध्येय असणार सगळ्यांचं
-SR.
PS: May The Force Be With You.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.