तसं पावसाळा काही माझ्या आवडीचा ऋतु नव्हे
पण पाऊस पडताना, प्रसन्न मात्र वाटते
वाऱ्याच्या खांद्या वर सवार होऊन
पावसाच्या सरी जेव्हा जमिनीला स्पर्श करतात
तेव्हा उठणाऱ्या त्या मातीचा सुगंध
आत्म्यास थंड करून जातो
ओसाड पडलेल्या त्या डोंगर रानांवर
जेव्हा त्या सरी बरसतात
तेव्हा जणू त्या डोंगरांनी हिरवा शालू नेसलाय
असं भासते
तसं पावसाळा काही माझ्या आवडीचा ऋतु नव्हे
पण पाऊस पडताना, प्रसन्न मात्र वाटते
असमान कडे आस लावून बसलेला बळीराजा
जेव्हा त्या पावसाच्या थेंबाला शेतावर बरसताना पाहतो
तेव्हा त्याच्या चेहऱ्यवरचं आनंद काही वेगळाच असतो
अक्षय तृतीया नंतर सणांचा जो अकाल पडतो
तो वारकऱ्यांच्या टाळांचा गजरा सोबत सुरु होतो
ते ह्याच पावसाच्या आगमनाने
म्हणून पावसाळा जरी माझ्या आवडीचा ऋतु नसला
तरी पाऊस पडला की सर्वत्र आनंद मात्र नक्कीच पसरतो
-SR.
PS: May The Force Be With You.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.