Sunday, 28 August 2022

दार उघडं बया

कधी कधी मागे वळून पाहतो जेव्हा
मनी एक प्रश्न सारखं घुटमळत असतो
या साठी का केला होता तो अट्टाहास
आयुष्यात बदल घडवण्यासाठी

तेव्हा श्वास घ्यायला थोडी फुरसत मिळायची
मित्रान सोबत गप्पा गोष्टी करायला वेळ काढता यायचा

सध्या सोमवार आली की डोळे वाट पाहतात 
ते शुक्रवारच्या सूर्यास्ताची
जणू मधे काही जगण्यासारखं, राहिलाच नाही आहे

अजून तरी सिमा रेषा नाही ओलांडल्या गेल्या आहेत
की त्याचा त्रास असह्य पातळीवर पोचला आहे
पण ही वेळ बदलेल, असं देखील काही चिन्ह दिसत नाही

बदल करण्याचे सारे प्रयत्नांना काही फळ मिळेना
आशा नुसती उंचावते
पण दिव्या खाली मात्र अंधारच राहतो

किती ही केलं तरी ते कमीच पडते 
काही जणं म्हणतात, नोकरी ही अशीच असते

जे आहे ते योग्य आहे की अयोग्य 
ह्याचा काही नेम लागत नाही
पण जो वर काही दुसरे दरवाजे उघडत नाही
तोवर लढत राहणे, हा एकच पर्याय दिसत आहे

म्हणून कधी कधी मागे वळून पाहतो जेव्हा
मनी एक प्रश्न सारखं घुटमळत असतो
या साठी का केला होता तो अट्टाहास
आयुष्यात बदल घडवण्यासाठी

-SR.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.