कुठल्या मोठ्या लेखकाने नव्हे तर ह्या ओळी ह्याच गरिबानी लिहिल्या होत्या जेव्हा मी माझा पहिला मराठी लेख लिहिला. आज एक छोटीशी गोष्ट कानावर आली तेव्हा मन खूप खोल विचारात गेलं. आणि हो, मोठेपणा नाही, पण मी खोल म्हटलं तर ते खरंच खूप खोल असते. शेवटी, काही उत्तर सापडेना. म्हणून म्हटलं प्रश्न लिहून कडूया.
एका ओळखीच्या घरात, त्या कुटुंबीयांनी एक मुलगा दत्तक घेतला आहे. मी जेव्हा एका कार्यक्रम निमित्त त्यांना भेटलो. तेव्हा मी ह्या मुलाला पाहिलं. सर्वांना नाश्ता आणून देत होता. आधी मला वाटलं की असावा शेजारी किंवा कोणा नातेवाईकांचा. पण नंतर समजलं, त्याला दत्तक घेतलं आहे. मी एका क्षणासाठी स्तब्ध झालो. या आधी मी ह्या गोष्टी चित्रपटान मधे पाहिले होते. पण असाच एक व्यक्ती किंवा अनुभव डोळ्या समोर पाहिला तेव्हा शब्द काही आले नाही. त्या क्षणातून बाहेर आलो आणि त्या मला कडे पाहिलं. परखा होता पण आपल्यांन सारखा मिसळून राहत होता. आता स्वभाव माझा बारकाईने पाहणं आहे म्हणून मी त्याला बगत होतो.
त्याची गोष्ट अशी होती की तो आणि त्याची बहीण पुणे इथे एका आश्रमात राहत होते. त्याचं वय साधारणता ७-८ वर्ष असावं. त्याला एका मुंबई च्या कुटुंबाने दत्तक घेतलं तर त्याच्या बहिणीला कोल्हापूरच्या एका कुटुंबाने. तितकच ऐकून, हृदय अजून एकदा पिळून निघाला.
म्हणजे, काय त्याच्या त्या लहान मनावर यातना झाल्या असाव्यात? त्याला त्याची बहीण पुन्हा कधी दिसेल की नाही?
त्याच्या चेऱ्यावर फक्त हसू होतं, पण त्या हसू मागे काही नसावं मी इतकीच प्रार्थना करेन. कसं नशीब असते एक एकांचा. जे अनुभव, खऱ्या आयुष्याचे मला ३३ वर्षात आले नाही ते त्या गोजिरवाण्याला ७-८ च्या वयातच येवो? आपण आपल्या कुटुंबाशी किंवा मित्र परिवाराशी लांब थोडं नाही राहू शकत. आणि ह्या इकडे त्याला त्याची बहीण परत कधी दिसेल का? हाच प्रश्न आहे.
त्याला जेव्हा नाव विचारलं तर त्यांनी त्याचा नवीन नाव एक झटक्यात सांगितलं. माझ्या मनात विचार हा आला की, मागचे ७ वर्ष त्याने असेच पुसून टाकले का? जे नाव त्याची ओळख होती इतकी वर्ष ते त्याला इतक्या लवकर विसरून नवीन नाव तोंड पाठ व्ह्यावं? एखाद्या लहान बाळाला आपण त्याचं नाव कसं शिकवतो? मग तो त्याच्या भाषेत उच्चारायचा प्रयत्न करतो. ७-८ वया पर्यंत ते नाव त्या बाळाला आता पूर्ण उच्चारता येते. आणि अचानक त्याला नवीन नाव शिकायला लावणं? कसं असेल ती प्रक्रिया?
आज त्याला एक नवीन कुटुंब मिळाला आहे, पण तो खूश आहे का? त्या मुलाच्या चेहर्या मागे काही दुःख नाही ना?
मला तर काही उत्तर मिळाले नाही. पण तो समारंभ संपला आणि घरी जायची वेळ झाली होती. निघताना परत एक शेवटचा प्रश्न आला, तो मुलगा जेव्हा म्हणेल मी घरी जातोय तेव्हा त्याच्या मनात नेमकी कुठलं घर पाहिलं येत असावे?
-SR.
PS: May The Force Be With You.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.