Thursday, 19 December 2019

आयुष्याचे कोडे

नक्की प्रश्न सुटले की गुंता अजून वाढला
हेच समजत नाही

पसरलेली ही शांतता सुखाची आहे 
कि येणाऱ्या वादळाची चाहूल
तेच काही कळत नाही

श्वास आहे म्हणून आपला काही तरी करतोय
पण आत्मा जणू हरवल्या सारखं भासते

कोणाशी कसा आणि काय बोलू 
तेच काही कळत नाही

व्यक्त केलेल्या भवनांने मन तसं हल्कं झालं पाहिजे
पण तसा आनंद मला काही जाणवतच नाही

जे करतोय ते योग्य आहे कि अयोग्य 
ह्याचं देखील काही ठाम पत्ता नाही

मोकळा श्वास मिळेल कि अजून कोंडी होणार
हेच समजत नाही

कारण प्रश्न नक्की सुटले कि गुंता अजून वाढला
हाच पेच काही सुटत नाही



-SR.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.